युवा फोरम इंडियातर्फे आयोजन
*💫कुडाळ दि.०२-:* युवा फोरम इंडियातर्फे दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील जीवन कुडाळकर ग्रुप कुडाळ यांचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक बाल गणेश कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांचा व तृतीय क्रमांक प्रथमेश सावंत आणि ग्रुप मालवण यांचा आला. आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी व गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी युवा फोरम संस्थेच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेचे आयोजन दिवाळी निमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेत सिंधुदुर्गातून बऱ्याच स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली होती. अत्यंत मनमोहक असे किल्ले उभारले होते. या स्पर्धेचे प्रायोजकत्व गजानन कांदळगावकर यांनी केले तर परीक्षण रजनीकांत कदम यांनी केले. किल्ले स्पर्धाचे बक्षीस वितरण मंगळवारी रोजी युवा फोरमच्या कार्यालयात दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे प्रायोजकत्त्व गजानन कांदळगावकर, परिक्षक रजनीकांत कदम, आदित्य बटावले, युवा फोरम संस्थेचे अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ऍड. हितेश कुडाळकर तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते जीवन कुडाळकर आणि ग्रुप कुडाळ, द्वितीय क्रमांक प्राप्त बाल गणेश कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला आणि तिसर्या क्रमांकाचे प्रथमेश सावंत आणि ग्रुप मालवण यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी गजानन कांदळगावकर यांनी युवा फोरम इंडिया तर्फे आयोजित करण्यात येणार्या उपक्रमाबद्दल संस्थेच्या कार्याचा गौरव केला. व आपली संस्कृती जपण्यासाठी व गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी, इतिहासाची माहिती होण्यासाठी किल्ले स्पर्धा आयोजित केली हा स्तुत्य उपक्रम आहे. सर्वांनी इतिहास वाचला पाहीजे, जाणुन घेतला पाहिजे असे आवाहन उपस्थित युवा वर्गाला केले. या कार्यक्रमावेळी महिला प्रतिनिधी सिद्धी सावंत आणि संपर्कप्रमुख पूजा खानोलकर यांनी कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत, ओळख व प्रस्तावना केली. यावेळी उपसचिव अश्विनी जोशी, वालंटियर प्रमुख जय पडते, ओरोस प्रदेशाध्यक्ष हार्दिक कदम, वेंगुर्ला प्रदेशाध्यक्षा सायली चव्हाण, श्रद्धा राऊळ, आकाश मुणगेकर , सौरभ शिरसाट, पूजा करमरकर, सुयश घाटकर, दिप्ती पंडित, सचिन कदम, रोहन काळसेकर सहभागी स्पर्धक व युवा फोरम चे सदस्य व पदाधिकारी आदी उपस्थित होते.