पिंगुळी ते पाट रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात भरा-:अतुल बंगे

*💫कुडाळ दि.०२-:* पिंगुळी ते पाट रस्त्याची चाळण झालेली आहे या रस्त्यावरील डागडुजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करूनही कामाला सुरुवात होत नाही आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून गप्प होतो यापुढे लोकांना होणारा त्रास सहन करणार नाही रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा पुढील होणा-या परीणामास सज्ज रहावे असा इशारा बांधकाम विभागाला माजी पंचायत समिती सदस्य श शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिला आहे. बंगे यांनी सांगितले की, गेले कित्येक दिवस पिंगुळी पाट रस्त्यावर खड्डे पडले असुन यासाठी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी संबधित विभागाला निधीची तरतूद केली असे वारंवार सांगितले जाते. पिंगुळी मठ येथील रस्त्यावर सध्या खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे ते संपले कि ते पाट रस्त्याला सुरवात करणार परंतु महीने पाठी पडत आहेत पण खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून या भागातील जनता आम्हाला आरोपीच्या पिंज-यात उभी करुन जाब विचारत आहे. आता येत्या आठ दिवसात खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागाने सुरू न केल्यास बांधकाम विभागाने पुढील होणा-या परीणामास सज्ज रहावे असा इशारा बंगे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page