सिंधुदुर्ग एसटी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन. भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच

बनी नाडकर्णी यांचा एसटी प्रशासनाला इशारा

*💫कुडाळ दि.०२-:* सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळेमूळ विभाग नियंत्रक कार्यालयेच “भ्रष्टाचाराची” केंद्र बनले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी करीत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन हा भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच असा इशारा नाडकर्णी यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे. या प्रसिध्दी पत्रकात बनी नाडकर्णी यांनी नमुद केले की, सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळेमूळ विभाग नियंत्रक कार्यालयेच “भ्रष्टाचाराची” केंद्रे आहेत, दहा, वीस झाले तरी एकच क्लार्क, आणि एकच अधिकारी, एकाचं खुर्चीवर आहेत हे कसं काय शक्य आहे ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळे मूळे विभाग नियंत्रक कार्यालयातुनच खोदून काढून एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाचा गलथान कारभार जनते समोर आणणारच. तसेच एस टी कामगारांच्या होणाऱ्या हाल अपेष्टानां नियंत्रक विभाग कार्यालयचं जबाबदार असल्याचीही त्यांनी थेट टीका केली आहे. एसटी नियंत्रक विभागा विषयीचे ठोस पुरावे आपल्या हाती लागले असून आपण ते थेट महाराष्ट्र एसटी व्यवस्थापक यांच्याकडे घेऊन जाणार असल्याची माहिती देत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना एस टी कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देणार असल्याचे बनी नाडकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच एस टी नियंत्रण विभाग कार्यालयाच्या गलथान कारभारामूळ एस टी कामगार वर्गाची पिळवणूक झालेली महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना खपवून घेणार नसल्याचं बनी नाडकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केल.

You cannot copy content of this page