राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन
*⚡सावंतवाडी ता.१२-:* येथे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले आहे. या भागातील निसर्ग, समुद्र मोठ्या प्रमाणात लाभला असून, त्याला अनुसरून येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, जेणेकरून मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला भविष्यात मोठे स्वरूप प्राप्त होण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले आहे….
