*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत हरिभाऊ चव्हाण यांची अखेर औरंगाबाद येथे बदली झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आतच त्यांचे या पदावरून तडकाफडकी बदली करून औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डाॅ. चव्हाण यांना संधी मिळताच त्यांनी मागील काळातील काही संदर्भावर जिल्ह्यातील काही तज्ज्ञ, नामांकित खाजगी डॉक्टरवर कारवाईचे पाऊल उचलले होते. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार या जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्याकडे शासनाने सोपविला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार घेतल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी गरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवा देण्यावर चांगला भर देणार असल्याचे पत्रकार परिषद घेत सांगितले होते. मात्र जिल्ह्यातील एका गर्भतपासणी केंद्रावर मागील काळातील संदर्भातून धाड टाकत कारवाईचे पाऊल उचलले होते. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली हाेती. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडेही तसेच पालकमंत्र्यांकडेही जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेने डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या कारभाराबाबत लक्ष वेधले होते. सध्या तरी शासनाने येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती दिलेली नाही. मात्र या पदाचा अतिरिक्त कार्यभार येथील नामांकित अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे शासनाने हा कार्यभार सोपवीला अाहे.
अवघ्या दोन महिन्यातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची तडकाफडकी बदली
