शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास मालवणमध्ये शुभारंभ

*सदस्य नोंदणीत मालवण तालुका आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे काम- जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर

*💫मालवण दि०१-:* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि शिवसेनेचे कार्य प्रत्येक घरात पोहोचविण्याठी काम करतानाच शिवसेनेने सुरू केलेल्या नोंदणी अभियानात मालवण तालुका आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष श्री संग्राम प्रभुगावकर यांनी येथे बोलताना केले शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अतुल रावराणे व माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मालवण शाखा येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, मंदार केणी, पंकज सादये, जोगी, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, संदीप हडकर, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री प्रभुगावकर यांनी प्रत्येक केंद्रावर १५ क्रियाशील सदस्य बनवावे. त्यांनी १५ ते २० सदस्य नोंदणी करावी. प्रत्येक केंद्रावर ३५० सदस्य असतील तर कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेला प्रत्येक केंद्रावर मताधिक्य मिळणारच. असा विश्वास व्यक्त केला तर तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी संपूर्ण शहर, तालुक्यात १५ डिसेंबर पर्यत सदस्य नोंदणी अभियान सुरू राहणार असल्याचे सांगितले. फोटो : मालवण तालुका शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ तालुका निरीक्षक अतुल रावराणे व माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

You cannot copy content of this page