*💫कुडाळ दि.०१-:* कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे. या चारही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपीं असून तो अद्याप फरार आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अवैद्य गौण खनिज वाहतूक होते की नाही यासाठी आंदुर्ले खिंड येथे वाहन तपासणी शुक्रवारी मध्यरात्री थांबलेल्या कुडाळ तहसीलदार अमोघ पाठक सहकाऱ्यांवर वाळू माफियांनी त्यांचा पांढऱ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा कार (एमएच ०७ एजी ६९६६) ने पाठलाग करून काचेच्या बाटल्या व दांड्या घेवुन अंगावर हल्ला मारण्याच्या हेतु धावून जात ठार मारण्याची धमकी दिली तसेच वाळू वाहतुक रोखण्यासाठी बाहेर पडाल, तर तंगड्या तोडू, अशी धमकी देत कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत तहसीलदार यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याची तक्रार फाटक यांनी कुडाळ पोलिसांत दिली होती. या प्रकरणी चित्तरंजन सावंत यांच्यासह तीन जणाविरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले संशयित चित्तरंजन सावंत, प्रदीप घाडी, कल्पेश पावसकर, गोविंद साटेलकर (रा. सर्व कुडाळ) या सर्वांना मंगळवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
कुडाळ तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी…
