सावंतवाडी तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीस आजपासून प्रारंभ

*येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे करा सदस्य नोंदणी- सतिश सावंत*

*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगामी काळात येणारी जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोंदणी महत्त्वाचे ठरणार असून खोटी सदस्य नोंदणी न करता प्रामाणिकपणे प्रत्येक घराघरात जाऊन सदस्य नोंदणी करा असे आवाहन सावंतवाडी तालुका शिवसेना पक्ष निरीक्षक तथा जिल्हा बँक संचालक सतीश सावंत यांनी केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर 1 ते 15 डिसेंबर हा पंधरवडा शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी म्हणून राबविला जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यामध्ये आजपासून सदस्य नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील या कार्यक्रमाची सुरुवात तालुका पक्ष निरीक्षक सतीश सावंत यांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, माथाडी कामगार नेते आप्पा पराडकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सतीश सावंत म्हणाले, शिवसैनिक हा शिवसेनेचा पाया आहे हा पाया मजबूत संघटित झाल्यास शिवसेना पक्ष मजबूत होईल त्यामुळे शिवसेनेचे सदस्य नोंदणी हा कार्यक्रम पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज जिल्ह्यामध्ये विरोधकांकडून य ज्याप्रमाणे वातावरण निर्माण करण्यात आले आहे ते हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःची निवडणूक असल्याप्रमाणे सदस्य नोंदणी मध्ये झोकून द्या. कागदावर दाखवण्यापुरते खोटी नोंदणी न करता प्रत्येक घरापर्यंत जाऊन विश्वासाने हे नोंदणी करा. गावातील कार्यकर्ता मोठा होण्यासाठी आणि गावातील पक्षाचे वर्चस्व वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी कार्यक्रम पक्षाकडून राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले शिवसेना पक्षाची संघटना आणि इतर पक्षांची संघटना ही वेगळी आहे. शिवसैनिक म्हटला की आगळा वेगळा मानसन्मान त्याला मिळतो सावंतवाडी तालुक्यामध्ये असलेल्या नऊ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सदस्य नोंदणी मध्ये प्रत्येकाने काम केले पाहिजे कोरोना महामारी सारख्या काळात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिली आहे आज काहीशी विकासकामे थांबली असली तरी आगामी काळात विकास कामे जोमाने होणार आहेत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात मध्ये जिल्ह्यात केलेले काम जिल्ह्यासाठी आणलेल्या निधी लक्षात घेता याठिकाणी सदस्य नोंदणी खूप सोपी जाणार आहे. सदस्य नोंदणी मध्ये जो तालुका आघाडीवर असेल त्याला दहा हजार रुपये बक्षीस त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तिसऱ्या ही विधानसभा मतदारसंघात निर्विवादपणे शिवसेनेचाच आमदार निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी असलेली महिलांची उपस्थिती पाहता त्यानी महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक देखील केले आहे. महिला जिल्हाध्यक्ष जानवी सावंत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महिला तालुका अध्यक्ष अपर्णा कोठावळे, शिवसेना प्रणित माथाडी कामगार सरचिटणीस प्रशांत कोठावळे, नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, मायकल डिसोजा, कमला मेनन, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, योगेश नाईक, गुणाजी गावडे, नाना पेडणेकर, सागर नाणोसकर आदी पदाधिकारी तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page