Headlines

देवगड मध्ये चार जागांसाठी ७४. ४६% मतदान…

*⚡देवगड ता.१८-: देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उर्वरित चार प्रभागातील निवडणूक १८ जाने. सोमवारी झालेल्या चारही प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्त पणे गर्दी केली होती. या चारही प्रभागात मिळून सरासरी ७४.४६%(टक्के )मतदान झाले.मतदानाच्या पहिल्या दोन तासात चारही प्रभागात सरासरी १३.६८टक्के एवढे मतदान झाले नंतरच्या दोन तासात दु.११.३० वाजेपर्यंत त्याच गतीने सरासरी ३५.८९…

Read More

श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न…

*⚡सावंतवाडी ता.१८-:* येथील तालुक्यातील माजगाव गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव आज उत्साहात पार पडला यावेळी कोविड नियमांचे पालन करून भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.नवसाला पावणारी व माहेरवाशीयांची पाठराखी असे या श्री देवी सातेरी ची ख्याती आहे या श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव आज उत्सव उत्साहात पार पडला.

Read More

कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाची तातडीने बदली करा…

वंचित बहुजन आघाडीची मागणी; अन्यथा २६ जानेवारीला उपोषण… *⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडी नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षक कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय करत असून, त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच मयत जयानंद पाटणकर यांच्या जागी त्याचा मुलगा प्रशांत पाटणकर यांना वडिलांच्या जागेवर वारसाहक्कानुसार सावंतवाडी नगरपालिकेच्या सेवेत रुजू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शाखेकडून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे…

Read More

कोरोना नसलेल्या शाळा सुरू कराव्यात

शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी शासनाकडे मागणी दोडामार्ग ता.१८-:ओमायक्रोनची धास्ती आणि कोरोणा च्या तिसर्‍या लाटेत अचानक शाळा बंद झाल्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहत आहे त्यामुळे शासनाने कोरोणाचा प्रादुर्भाव नसलेल्या शाळा सुरू कराव्या अशी शिक्षक संघटना आणि शालेय व्यवस्थापन समित्या, पालक यांच्याकडून मागणी वाढत असून राज्य शासनाने या मागणीचा विचार करून…

Read More

केबलसाठी केलेली खोदाई नियमभंग करणारी मुख्याधिकारी व बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अन्यथा २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचे दिगंबर साटेलकर यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.१८-:* मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी शहरात करण्यात आलेली रस्ता खोदाई पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा भंग करून करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून चुकीच्या पद्धतीने केलेले काम पुन्हा करण्यात यावे तसेच जबाबदारी झटकलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी व बांधकाम अधिकार्‍यांवर कारवाई करा अन्यथा हा…

Read More

भाजप महिला चित्रपट आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. नमिता गावकर

*⚡मालवण ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा भाजप चित्रपट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत सौ. नमिता गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांच्या हस्ते सौ. नमिता गावकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारीणीची सभा पार पडली या सभेदरम्यान ही निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील चित्रपट…

Read More

पर्यटन व्यावसायिक घेणार जिल्हाधिकारी यांची भेट

कोरोनामुळे बंदी असल्याने शासनाने दिलासा देण्याची करणार मागणी मालवण (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पर्यटन स्थळे बंदच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी, ऍग्रो ,निसर्ग ,जलक्रीडा पर्यटनासाठी साठी येणारे पर्यटक येणे पूर्ण पणे बंद झाले असून पर्यटन ठप्प होऊन येणाऱ्या काळात या व्यवसायातील लोकांसमोर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देण्यासंबंधी शासनाने विचार करावा या…

Read More

वायंगणी घाडीवाडी दत्त मंदिरात झाले दिनदर्शिका प्रकाशन

मालवण दि प्रतिनिधी वायंगणी घाडीवाडी येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य दादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दादा महाराज दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून दामोदर साळकर, प्रकाशक सिताराम (नाना) करमळकर, वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर, रुपेश अवसरे, सदानंद राणे, रामदास प्रभू , हनुमंत उर्फ सुंदर प्रभू चंद्रकांत गणेश कुबल,…

Read More

हरी चव्हाण यांचा आस्था ग्रुपने केला सत्कार

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची झाली आहे निवड मालवण दि प्रतिनिधी आस्था ग्रुप मालवणचे माजी अध्यक्ष हरी चव्हाण यांची भारतीय मजदुर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल आस्था ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश…

Read More

वेंगुर्ला-कुडाळ रस्त्याचे आमदार केसरकर, नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला-मठ-कुडाळ-पणदूर-हुमरमळा-जांभवडे-घोटगे-गारगोटी या राज्यमार्ग १७९ रस्त्यावरील ११.८५० किमी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण या कामाचे तसेच याच रस्त्यावरील वेतोरे शंभू भवानी स्टॉप नजिकच्या पुलाचे बांधकाम करणे या कामाची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वेतोरे येथे संपन्न झाले. ५०/५४ मार्ग पुल यावरील भांडवली खर्च अंतर्गत सुमारे १२ किमी रस्त्यासाठी २.५ कोटी…

Read More
You cannot copy content of this page