Headlines

शेखर शेणई यांना श्रमशक्ती कलारत्न फिनिक्स अवॉर्ड

*⚡वेंगुर्ला ता.१८-: श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकरंजीच्यावतीने वेंगुर्ला येथील ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे मालक दत्तात्रय उर्फ शेखर रामचंद्र शेणई यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती कलारत्न फिनिक्स अवॉर्ड २०२२ सन्मानर्पूक प्रदान करण्यात आला. विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा कार्यक्षेत्रामध्ये रुजावणा-या तसेच राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्त्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ…

Read More

कणकवली शहरातील हायवेवरील आरओडब्लू लाईन निश्चित करावी

मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांची मागणी *⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हाच्या पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार हायवे अधिकाऱ्यांनी फक्त कणकवलीच्या शिवाजी चौकातील आरओडब्लू लाईन पांढरा चुना टाकून निश्चित केली. त्याप्रमाणे त्यांनी वागदे ते जानवलीपर्यंत पुन्हा एकदा आरओडब्लू लाईन टाकून हायवेची हद्द कायमस्वरुपी निश्चित करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी संबंधित खात्यांकडे केली आहे. नवीन हायवेच्या दुतर्फा हायवे…

Read More

मणचेकर यांच्यातर्फे अन्नदान

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला लिनेस क्लबतर्फे लिनेस प्राची मणचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला-कॅम्प येथील कातकरी व लमाणी समाजातील ५० जणांना अन्नदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उर्मिला सावंत, प्राची मणचेकर, नीला यरनाळकर, हेमा गावस्कर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, कविता भाटीया, शर्मिला मठकर, बिना भाटीया, दिश कर्पे व स्मिता कोयंडे उपस्थित होत्या.

Read More

काजू फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृतीपर वेबिनार

*⚡वेंगुर्ला ता.१८-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यभरात ‘काजू फळपिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन‘ याबाबत प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी वेबिनारच्या माध्यमातून आयोजित केला आहे. या मोहिमेंतर्गत काजू उत्पादन वाढीच्या विविध विषयांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे. या संदर्भात पुणे कृषी आयुक्तालयाद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृषी विभागामार्फत ‘पिकेल ते विकेल‘ अभियानांतर्गत एक वेबिनार मालिका…

Read More

त्रिंबक सोसायटी चेअरमन पदी श्रीकांत बागवे तर व्हाईस चेअरमन पदी रमेश परब

*⚡मालवण ता.१७-:* त्रिंबक ग्रूप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी त्रिंबक माजी उपसरपंच श्रीकांत बाबाजी बागवे यांची तर व्हाईस चेअरमन पदी पळसंब येथील रमेश वामन परब यांची निवड झाली. त्रिंबक ग्रूप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नुतन संचालकांची बैठक आज पार पडली या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिका-यांचे संस्थेचे माजी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १४९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७*-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५२ हजार २४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा स्वाभिमान आणि नागरिकांचा अभिमान गमावला:दया मेस्त्री

*⚡कणकवली ता.१७-:* राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्यात आली. यात सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांच्या बंगल्याचे नाव सिंधूरत्न असे करण्यात आले आहे. वास्तविक हे नाव सिंधुदुर्ग असे असायला हवे होते. मात्र सिंधुदुर्ग असे नाव बंगल्या देण्यास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कमीपणा वाटला का? पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा स्वाभिमान आणि नागरिकांचा अभिमान गमावला असल्याचे मनसेचे उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हंटले आहे. मंत्र्यांच्या…

Read More

बॅ.नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ईशा मुसळे प्रथम

नगरवाचनालय,कणकवलीतर्फे वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर *⚡कणकवली ता.१७-:* कणकवली नगरवाचनालयाच्या वतीने कै.आनंद आळवे पुरस्कृत बॅ.नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा वाचनालयाच्या सभागृहात पार पडली. या स्पर्धेत ईशा मुसळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक विभागून दिव्यालक्ष्मी लाड,मैत्रेय हरकुळकर तर सानिका काळसेकर , स्वानंद जोशी तृतीय क्रमांक पटकाविला आहे . समृद्धी सावंत , दुर्वा मुगणेकर यांनी उत्तेजनार्थ…

Read More

लसीकरणाची वर्षपूर्ती: विकासाचा उंचावता आलेख

भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन *⚡कणकवली ता.१७-:* केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस काल एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ मिळाले असून देशाचे जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत असल्याबद्दल भाजपचे श्री राजन तेली यांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले. एका बाजूला सर्वाधिक सुरक्षा…

Read More

ग्राहकांशी उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा…

माजी नगरसेवक सुरेश भोगटे याची पोस्टमास्टर कडे निवेदनाद्वारे मागणी *⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी ग्राहकांना योग्य वर्तणूक न देता. त्यांच्याशी उद्धटपणे वागत असून, ग्राहकाला उत्तर देत नाहीत. अशी तक्रार माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी पोस्ट मास्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्राहकांशी उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा २६ जानेवारी रोजी…

Read More
You cannot copy content of this page