काजू फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृतीपर वेबिनार

*⚡वेंगुर्ला ता.१८-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यभरात ‘काजू फळपिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन‘ याबाबत प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी वेबिनारच्या माध्यमातून आयोजित केला आहे. या मोहिमेंतर्गत काजू उत्पादन वाढीच्या विविध विषयांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.

या संदर्भात पुणे कृषी आयुक्तालयाद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृषी विभागामार्फत ‘पिकेल ते विकेल‘ अभियानांतर्गत एक वेबिनार मालिका सुरु करण्यात आली आहे. ‘चर्चा करु शेतीची कास धरु प्रगतीची‘ हे या मालिकेचे नाव आहे. दर बुधवारी याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. या मालिकेच्या २५ जानेवारी रोजीच्या ६८ भागात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.कैलास मोते व वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई हे काजू फळ पिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम कृषी विभागाच्या युट्युब चॅलनच्या https:www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिकवरुन जास्तीत जास्त लोकांना पाहता येणार आहे. काजू पिकाचे लागवडीपासून ते फळधारणेपर्यंत कीड व रोगांपासून संरक्षण करुन उत्पादन वाढ कशी करावी याची विस्तृत चर्चा या वेबिनारमध्ये होणार आहे. तरी राज्यातील सर्व कृषी अधिकारी वर्ग व शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page