त्रिंबक सोसायटी चेअरमन पदी श्रीकांत बागवे तर व्हाईस चेअरमन पदी रमेश परब

*⚡मालवण ता.१७-:* त्रिंबक ग्रूप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी त्रिंबक माजी उपसरपंच श्रीकांत बाबाजी बागवे यांची तर व्हाईस चेअरमन पदी पळसंब येथील रमेश वामन परब यांची निवड झाली. त्रिंबक ग्रूप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या नुतन संचालकांची बैठक आज पार पडली या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.

यावेळी नुतन पदाधिका-यांचे संस्थेचे माजी चेअरमन रघुनाथ घाडीगावकर माजी संचालक अशोक बागवे संस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सर्व नूतन संचालक पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर आचरा माजी सरपंच राजन गावकर, संतोष घाडीगावकर सुरेंद्र सपकाळ,दिलिप परब,शेखर त्रिंबककर, त्रिंबक संस्थेचे सचिव प्रशांत मेहेंदळे,चंदू त्रिंबककर, आदी मान्यवर उपस्थित होते निवडीनंतर बोलताना चेअरमन श्रीकांत बागवे यांनी नवीन संचालक मंडळ पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहून शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्रिंबक सोसायटीवर शिवसेना पुरस्क्रूत शिवशक्ती सहकारी पँनलने भाजप पुरस्क्रूत सिद्दीविनायक सहकारी पँनलचा धुव्वा उडवित सर्वच्या सर्व १३सभासद निवडून आणत एक हाती सत्ता स्थापन केली होती.

You cannot copy content of this page