बॅ.नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ईशा मुसळे प्रथम

नगरवाचनालय,कणकवलीतर्फे वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

*⚡कणकवली ता.१७-:* कणकवली नगरवाचनालयाच्या वतीने कै.आनंद आळवे पुरस्कृत बॅ.नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा वाचनालयाच्या सभागृहात पार पडली. या स्पर्धेत ईशा मुसळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक विभागून दिव्यालक्ष्मी लाड,मैत्रेय हरकुळकर तर सानिका काळसेकर , स्वानंद जोशी तृतीय क्रमांक पटकाविला आहे . समृद्धी सावंत , दुर्वा मुगणेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेला २६ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वी केली.

नगरवाचनालय , कणकवलीतर्फे आठवी ते दहावी शिकत असलेल्या विदयार्थ्यांसाठी कै.आनंद आळवे पुरस्कृत बॅ . नाथ पै वक्तृत्व स्पर्धा संसदेतील बॅ.नाथ पै यांची भूमिका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्व अशा दोन विषयांवर नगरवाचनालयाच्या सभागृहात आयोजित केली होती.या स्पर्धेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी नगरवाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान , सहकार्यवाहक डी.पी.तानावडे, सदस्य पी.जी.कांबळे,रवींद्र मुसळे,वैजयंती करंदीकर,डॉ . विनायक करंदीकर,परीक्षक नीलेश पवार,नयना केसरकर आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना नयना केसरकर म्हणाल्या, वक्तृत स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकाला प्रथमतः विषयाचे ज्ञान असले पाहिजे .

वक्त्याची शब्द फेक चांगली, असली पाहिजे.सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली.मात्र,काही गोष्टीत सुधारणा व्हावी यासाठी आपण मार्गदर्शन केले. ही एकच स्पर्धा नाही तर यापुढील स्पर्धेत ही आपण सहभाग घेत आपल्याला डेव्हलप करा,असा सल्ला त्यांनी विद्यार्थी स्पर्धकांना दिला. नीलेश पवार म्हणाले,या स्पर्धेकरिता माझी परीक्षक म्हणून निवड म्हणजे वाचनालयाने माझा केलेला एक प्रकारे सन्मान आहे . नगरवाचनालयाच्या कार्यकारिणीवर असलेल्या मान्यवर शिक्षकांमुळे माझी जडणघडण झाली आहे.या स्पर्धेतील स्पर्धकांनी जे भाषण केले.यातून हे विद्यार्थी एक दिवस उत्तम कवी,निवेदक व वक्ता होऊ म्हणून नावारूपास येतील तसेच संस्कारातून माणूस घडत असतो.त्याच्यावर योग्य संस्कार झाल्यास तो निश्चितपणे यश संपादन करेल.परीक्षक नेहमीच तुमच्यातील हिरा शोधून त्याला चमकवायच काम करत असतो.यासोबतच संसदेतील बॅ.नाथ पै यांची भूमिका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्व हे आजचे दोन्ही विषय महत्व पूर्ण आणि याचे विद्यार्थी दशेत गुण आत्मसात व्हावे यासाठीच देण्यात आले होते.असे सांगत महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनीफ पिरखान यांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी.पी.तानवडे यांनी केले. ही स्पर्धा कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात आली.

You cannot copy content of this page