Headlines

संजू परबांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता. १९ : शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांचा वाढदिवस आज मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. उपस्थितांनी संजू परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने दिवसभर विविध सामाजिक व पक्षीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page