Headlines

सावंतवाडीत ९६ हजारांचागुटख्याचा साठा जप्त…

एकाला अटक: सावंतवाडी पोलिसांची कारवाई..

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी येथील गवती मार्केट परिसरात पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत अब्दुलगणी शाह (रा. बुराण गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ९६ हजार १०२ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास भाट पेट्रोल पंपाशेजारील गवती मार्केट येथे ही कारवाई करण्यात आली. पानपट्टी स्टॉल क्रमांक ३ व ४ समोरील लाकडी फळीवर तसेच पानपट्टी स्टॉलमध्ये विक्रीच्या उद्देशाने गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
लोकांच्या आरोग्यास अपायकारक व प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर तपास करीत आहेत. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page