नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले: नितेश राणेंचे मानले आभार..
⚡सावंतवाडी ता. १९ -: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ताज’ प्रकल्प साकारत असल्याबद्दल सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री राणे यांच्या अथक प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ‘ताज’सारख्या नामांकित प्रकल्पाचे आगमन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी उभारी मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला देश-विदेशाच्या पर्यटन नकाशावर अधिक सक्षमपणे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘ताज’ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास श्रद्धा राजे भोसले यांनी व्यक्त केला.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानत, सिंधुदुर्गच्या विकासासाठी अशाच प्रकारे विविध प्रकल्पांना चालना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
