Headlines

उदय सामंतांनी‘ही सीट शिवसेनेचीच’ म्हटल्यावर मला आनंद झाला…

संजू परब: वाढदिवसाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो..

सावंतवाडी, ता. १९ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा कायम ठेवला असून, “ही सीट शिवसेनेची आहे,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. निलेश राणे यांच्या मागे ज्या ताकदीने उदय सामंत उभे राहिले, त्याचप्रमाणे आता माझ्यामागेही ते ठामपणे राहतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गोविंद चित्रमंदिरात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना संजू परब यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर भाष्य केले. “मी पक्षाचा पिंड कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काम करतच राहणार आहे. मात्र, पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत यांनी सावंतवाडीची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा केल्याने आपल्याला आनंद झाल्याचेही परब यांनी सांगितले.

माजी आमदार दीपक केसरकर यांनीही कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम करत राहावे, असे आवाहन केले.

“आपण सामान्य लोकांसाठी काम करत राहणार आहोत. तीच माझ्या कामाची पोचपावती असेल,” असे केसरकर म्हणाले. कोणाच्या वाढदिवसाला-बारशाला जाणार नाही; मात्र आपल्या कामातून लोकांशी जोडलेले राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील विविध विकासकामांना चालना मिळाल्याचे सांगण्यात आले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न सुटला असून अनेक रोजगाराचे प्रश्न मार्गी लागल्याचे परब यांनी नमूद केले. या कामांबाबत आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सभापती सुप्रिता जाधव, महिला जिल्हाध्यक्ष निता कविटकर, शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर, विद्याधर परब, दिनेश गावडे, संजय पडते, अजय गोंदावळे, सुनील राऊळ, स्नेहा नाईक, सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, देव्या सूर्याजी, अशोक दळवी, सुधन कवठणकर, शरद धाऊसकर, गुरु मठकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस, झेवियर डिसोझा, गजानन नाटेकर, बंटी पुरोहित, बाबू कुडतरकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page