*⚡वेंगुर्ला ता.१८-: श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, इचलकरंजीच्यावतीने वेंगुर्ला येथील ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे मालक दत्तात्रय उर्फ शेखर रामचंद्र शेणई यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती कलारत्न फिनिक्स अवॉर्ड २०२२ सन्मानर्पूक प्रदान करण्यात आला.
विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा कार्यक्षेत्रामध्ये रुजावणा-या तसेच राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्त्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ आणि निष्ठावान जागरुक नागरिक म्हणून श्री. शेणई यांना हा अवॉर्ड देण्यात आला.
