माजी नगरसेवक सुरेश भोगटे याची पोस्टमास्टर कडे निवेदनाद्वारे मागणी
*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी ग्राहकांना योग्य वर्तणूक न देता. त्यांच्याशी उद्धटपणे वागत असून, ग्राहकाला उत्तर देत नाहीत. अशी तक्रार माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी पोस्ट मास्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ग्राहकांशी उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा २६ जानेवारी रोजी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश नार्वेकर आणि मॉन्टी डिसोजा उपस्थित होते
