संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद-गोवेकर

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* वेताळ प्रतिष्ठान महोत्सवच्या माध्यमातून सर्वच स्तुत्य उपक्रमातून भावी संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करत आहे असे गौरोवोद्गार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर समिक्षक अभय गोवेकर यांनी केले. तसेच भविष्यात नवोदित क्रीडापटूंना प्रशिक्षण वर्ग व संधी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी सर्वोतोपरी आपल्याकडून सहकार्य करू असे प्रतिपादन केले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धा आणि दशावतार नाट्य महोत्सव अशा मनोरंजनात्मक अश्वमेध तुळस महोत्सवाची सांगता १२ जानेवारी रोजी झाली. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दादासाहेब परुळकर, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर समिक्षक अभय गोवेकर, सरपंच शंकर घारे, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, शेखर तुळसकर, चंद्रे परब, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागवेकर, प्रा.एम.बी.चौगले, लेखिका स्नेहा राणे, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे, जेष्ठ दशावतार दिलीप मेस्त्री-पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार, निवृत्त मुख्यध्यापक शामसुंदर मालवणकर, निवृत्त शिक्षक मंगेश मांजरेकर, दशावतार अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर, संजय पाटील, भंडारी महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव विकास वैद्य, शिक्षक धनंजय नाईक, शिक्षिका मनाली कांबळी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, महेश राऊळ, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, बंड्या राऊळ, प्रमोद तांबोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला, रंगभरण, निबंध, मॅरेथॉन, वक्तृत्व या स्पर्धांचे बक्षिस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

सामाजिक समरसता जपत ज्यांनी समाजाला दिशा देण्यासाठी आपले योगदान दिले अशा व्यक्तीपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठान च्यावतीने प्रतिवर्षी अशा व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावर्षी चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ दशावतार रंगभूमीची सेवा केल्याबद्दल जेष्ठ दशावतार दिलीप मेस्त्री-पांचाळ यांचा, कोरोना काळात जे अद्वितीय कार्य केले त्याबद्दल कोरोनायोद्धा म्हणून संजय दत्ताराम गावडे यांचा तर शतक महोत्सव साजर करणा-या साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच शिक्षण क्षेत्रात योगदानबद्दल कै. बाबली विष्णू स्मृती पुरस्कार उपक्रमशील शिक्षक धनंजय नाईक आणि शिक्षिका मनाली कांबळी यांना दादासाहेब परुळकर व अभय गोवेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

झी वाहिनीच्या कथालेखनमध्ये सर्वोत्तम ठरलेल्या लेखिका स्नेहा राणे व ज्यष्ठ क्रीडा समिक्षक अभय गोवेकर यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार, निवृत्त मुख्याध्यापक शामसुंदर मालवणकर, निवृत्त शिक्षक मंगेश मांजरेकर, दशवतार लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दशवातराला लौकिकप्राप्तीसाठी झटणा-या दशवतार मंडळाचे चालक-मालक सचिन पालव (इन्सुली), देवेंद्र नाईक (चेंदवण), गौरव शिर्के (सावंतवाडी), विघ्नराजेंद्र कोंडुरकर, रोहन सावंत, घनश्याम पालव, कुणाल परब (कलावंत) यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर आभार सागर सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page