देवगड मध्ये चार जागांसाठी ७४. ४६% मतदान…

*⚡देवगड ता.१८-: देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उर्वरित चार प्रभागातील निवडणूक १८ जाने. सोमवारी झालेल्या चारही प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्त पणे गर्दी केली होती. या चारही प्रभागात मिळून सरासरी ७४.४६%(टक्के )मतदान झाले.मतदानाच्या पहिल्या दोन तासात चारही प्रभागात सरासरी १३.६८टक्के एवढे मतदान झाले नंतरच्या दोन तासात दु.११.३० वाजेपर्यंत त्याच गतीने सरासरी ३५.८९ टक्के एवढे मतदान झाले.यात प्रभाग क्र ४मध्ये सर्वाधिक ४२.३९ %,तर सर्वात कमी प्रभाग क्र ७ मध्ये,२९.६१% एवढे मतदान होऊन या पुढील स.११.३० ते १.३० या वेळात प्रभाग क्र ४ मध्ये ६८.०४%,प्रभाग क्र ५ मध्ये ५३.०७% प्रभाग क्र ७ मध्ये ४५.६६%प्रभाग क्र ८ मध्ये ५२.१२ %,एवढे मतदान होऊन सर्वाधिक मतदान दु १.३० पर्यंत प्रभाग क्र ४ मध्ये झाले.दु १.३० ते ३.३० या वेळात प्रभाग क्र ४ मध्ये ७९.१५%   प्रभाग क्र ५ मध्ये   ६३.९८ % प्रभाग क्र ७ मध्ये  ५८.३८%  प्रभाग क्र ८ मध्ये ६९.७७%  एवढे मतदान ,सरासरी ६७.७१% मतदान झाले. 

तर दु.३.३० ते ५.३०  या वेळात प्रभाग क्र ४मध्ये,८२.५८%  प्रभाग क्र ५  मध्ये ७०.३१% प्रभाग क्र ७     मध्ये  ७०.७५% मतदान,प्रभाग क्र ८ मध्ये ७३.५९%मतदान झाले चार प्रभागातील सरासरी ७४.४६% मतदान झाले.        देवगड जामसंडेन.प.निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०४, (सर्वसाधारण महिला )-१)घाडी मनीषा अनिल , २)भडसाळे मृणाली महेश,  प्रभाग क्रमांक ०५,(सर्वसाधारण महिला)१)कुळकर्णी सुजाता उमेश ,२)जामसंडेकर ,मनीषा अनिल,      प्रभाग क्रमांक ०७ (सर्वसाधारण) यात १)खेडेकर रोहन विश्वनाथ , २)चांदोस्कर योगेश प्रकाश३),कणेरकर प्रफुल्ल भिकाजी, ४)कुळकर्णी सौरभ सुर्यकांत,५)मेस्त्री राजेंद्र बाळकृष्ण प्रभाग क्रमांक ०८(सर्वसाधारण ) यामधून १)तारी संतोष रवींद्र ,२) पारकर निधी नयन,३)नाडणकर प्रणव चंद्रकांत, या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी तसेच सर्व प्रभागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

You cannot copy content of this page