*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली तालुक्यातील माईन,कळसुली, जाणवली या तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील तीन गावात सरासरी ६६.६१ टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.तिनही गावांमध्ये त्या एका जागेसाठी चुरशीच्या लढती झाल्या आहेत.उद्या दि.१९ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे.या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार? सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माईण येथील एका जागेसाठी नितीन पाडावे , श्रीकृष्ण घाडीगांवकर रिंगणात आहेत .त्या ठिकाणी १०३ मतदार होते,त्यापैकी ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ७०.८७ टक्के मतदान झाले. कळसुलीच्या एका जागेसाठी चंद्रशेखर चव्हाण , प्रसाद कानडे यांच्यात लढत होत आहे . या ठिकाणी ६५२ मतदारांपैकी ४१२ मतदारांनी आपला हक्क बजावला.त्यामुळे सरासरी ५४.२९ टक्के मतदान झाले आहे.
तर जानवलीच्या एका जागेसाठी भालचंद्र दळवी व संतोष कारेकर असे उमेदवार रिंगणात आहेत .एकूण मतदार ६०५ होते,४२१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला,त्यामुळे ६१.८२ टक्के मतदान झालं आहे.तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत मध्ये १३६० मतदारांपैकी ९०६ मतदारांनी मतदान केल्याने तालुक्यात ६६.६१ टक्के सरासरी मतदान झाले आहे. प्रत्येक ठिकाणी एक झोनल अधिकारी , मतदान केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी एक व दोन , व्यवस्थापक , पोलीस कर्मचारी असे कर्मचारी तैनात होते . या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाले आहे.
