*⚡मालवण ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा भाजप चित्रपट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत सौ. नमिता गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांच्या हस्ते सौ. नमिता गावकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारीणीची सभा पार पडली या सभेदरम्यान ही निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील चित्रपट सृष्टी बाबत चर्चा झाली. आणि जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कलाकार नावारूपाला येऊन त्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून विचार करून काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी ना. राणे यांच्या मार्फत भाजप चित्रपट आघाडी कार्यकारिणी करून चळवळ पुढे नेण्यासाठी महिला भाजप चित्रपट आघाडी अध्यक्ष म्हणून नमिता गावकर यांची नियुक्ती करण्यात आली. चित्रपट आघाडी सिंधुदुर्ग भविष्यात मोठी प्रगती करून जिल्ह्यातील कलाकार याना खूप संधी मिळून कलेत पुढे येऊन त्यांच्या रोजगारात वाढ होऊन दरडोई उत्पन्न वाढून जिल्हा राज्यात एक नंबरला येईल, असे काम करण्याचे आवाहन करून यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू ना. राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जि. प.अध्यक्ष संजना सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जि. प. गटनेते रणजित देसाई, भाजप जिल्हा महिला अध्यक्ष संध्या तेरसे, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी उपस्थित होते.
