भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची झाली आहे निवड
मालवण दि प्रतिनिधी आस्था ग्रुप मालवणचे माजी अध्यक्ष हरी चव्हाण यांची भारतीय मजदुर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल आस्था ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, सल्लागार सूर्यकांत फणसेकर, विद्याधर केनवडेकर, भाऊ सामंत, मनोज चव्हाण, सौगंधराज बादेकर, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, रवी मिटकर, संग्राम कासले आदी उपस्थित होते. यावेळी भाऊ सामंत यांनी हरी चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.
