वंचित बहुजन आघाडीची मागणी; अन्यथा २६ जानेवारीला उपोषण…
*⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडी नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षक कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय करत असून, त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच मयत जयानंद पाटणकर यांच्या जागी त्याचा मुलगा प्रशांत पाटणकर यांना वडिलांच्या जागेवर वारसाहक्कानुसार सावंतवाडी नगरपालिकेच्या सेवेत रुजू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शाखेकडून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतेही कारवाई नगरपालिकेने केली नसल्याने २६ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकदिवसीय उपोषण करणार असल्याचं इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नामकरण बदलून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर नगरपरिषद हद्दीत असणारा गांडूळ खत प्रकल्प बंद करण्यात यावा, तसेच बाहेरचावाडा सावंतवाडी कुणकेरी रस्ता मंजूर होऊनही तो रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आला नाही. तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. तेथील स्वच्छता गृहाचे सुशोभीकरण करण्यात यावे अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
