Headlines

भाजप कडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोफत ई श्रम कार्ड नोंदणी व वाटप उपक्रमाचे आयोजन…

*⚡सावंतवाडी ता.२४-: भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडळाच्या वतीने प्रभाग क्र 7 मध्ये ई श्रम कार्ड मोफत नोंदणी व वाटप चे आयोजन करण्यात आले आहे.ही नोंदणी व वाटप मंगळवार दिनांक 25 जानेवारी सकाळी 11 वाजल्यापासून रवींद्र मंगल कार्यालय शेजारी विनोद सुकदेव सावंत येथे होणार आहे यासाठी आधार कार्ड, बँकेचे विवरण, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे घेऊन…

Read More

सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाच्या बळकट होणार

डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ *⚡सावंतवाडी ता.२४-:* सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आले आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार हा अभियान आजपासून सावंतवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसशी सभासद नोंदणी कार्यक्रम पूर्वी नोंदणी…

Read More

भाजप कडून सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना…

गटनेतेपदी विलास कुडाळकर यांची नियुक्ती कुडाळ ता.२४-: कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक श्री विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याना कुडाळ माजी नगराध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे,जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ…

Read More

संतोष परब हल्ल्याप्रकरणी चौकशीकरिता आम.नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात

कणकवली 24 जानेवारी(प्रतिनिधी)- शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी चौकशी करिता आमदार नितेश राणे सोमवारी कणकवली पोलिस स्टेशनला उपस्थित राहिले. मात्र पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे नेमकी काय चौकशी केली, याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. संग्राम देसाई हे देखील उपस्थित होते. संतोष परब हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

अनधिकृत वाळू उत्खननामुळे नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांची मागणी *⚡कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडा, पियाळी, कासार्डे वगैरे गावांतील इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात अनधिकृत वाळू उत्खननामुळे नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान होत आहे तसेच शासनाचा ४ कोटी ९१ लाख महसूल बुडाल्याने झालेल्या नुकसान प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कणकवली तालुका अध्यक्ष…

Read More

अंध अपंग, मूकबधिर इत्यादी आजाराने ग्रस्त रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात होणार तपासणी…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.२४-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात अंध-अपंग, मूकबधिर कर्णबधिर अस्थिव्यंग यांच्यासाठी डॉक्टर येऊन तपासणी करून दाखल देणार आहेत ही तपासणी 25 जानेवारी रोजी होणार आहे अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली. हा उपक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. या दाखल्याचा…

Read More

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी शिक्षिका प्रेरणा चव्हाण यांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी शिक्षिका सौ. प्रेरणा परशुराम उर्फ पी. पी. चव्हाण यांचे सोमवारी पहाटे ५.०० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे. निवृत्त शिक्षण अधिकारी परशुराम चव्हाण यांच्या त्या पत्नी होत.

Read More

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू

*⚡सावंतवाडी ता.२३-:* आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे ( आकेरी) असे त्या युवकाचे नाव असून, याबाबतची खबर त्याचा भाऊ ऋषिकेश गावडे यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात…

Read More

कणकवलीत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

*⚡कणकवली ता.२३-:* हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात…

Read More

के.एन.के.स्मॅशरतर्फे २५ जानेवारीपासून बॅटमिंटन स्पर्धा

कणकवली ता.२३-: के.एन.के.स्मॅशर तर्फे २५ ते २६ जानेवारी या कालावधीत सकाळी ९ वा.नगरपंचायतीच्या हॉलमध्ये बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ वर्षांखालील पुरुष गट ( सिंगल ) , खुला गट ( एकेरी व दुहेरी ) , ४० वर्षांवरील पुरुष ( दुहेरी ) अशा गटांत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी निखिल…

Read More
You cannot copy content of this page