Headlines

गिरप आणि टीमचा परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत – अॅड.देवदत्त परुळेकर

वेंगुर्ला प्रतिनिधी – शहरातील विकास कामात राजकारण आणू नये हा दिलीप गिरप आणि त्यांच्या टीमने घालून दिलेला परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत आहे. चांगल्या लोकांनी राजकारणात राहिले तरच नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास होऊ शकेल. शहराच्या वैभवात भर घालणा-या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची देखभाल आणि देखरेख होणे तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर यांनी केले. वेंगुर्ल्याचे…

Read More

हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी केले अभिवादन…

*⚡सावंतवाडी ता.२३-:* हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Read More

पाळणेकोड धरण परिसरात बाळासाहेबांचे वृक्षरुपी स्मारक साकारले

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा पुढाकार : जयंतीनिमित्त स्मारकाला दिल्या मानवंदना *⚡सावंतवाडी ता.२३-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी हिंदुहृदसम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाळणेकोडं धरण येथे वृक्षारोपण करून वृक्षरुपी स्मारक साकारले होते. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त त्याच क्लपवृक्ष स्मारकाला मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,…

Read More

तळेरे येथे महावितरणची वीजपुरवठा करणारी मुख्य डीपी सताड उघडी

राजेश जाधव यांनी कनिष्ठ अभियंत्यांचे लक्ष वेधले कणकवली ता.२३-:* मुंबई गोवा महामार्गानजीक तळेरे येथील डोंगरे किराणा दुकाना समोर बसविण्यात आलेली महावितरण कंपनीची वीजपुरवठा करणारी मुख्य डीपी सताड उघडी ठेवण्यात आली आहे.याबाबत चुकून एखाद्याला शाॅक लागून दुर्दैवी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव…

Read More

समर्पण नमो ऍप बाबत भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

ऍपच्या माध्यमातून जमा होणार पार्टी फंड वेंगुर्ला प्रतिनिधी – राष्ट्रीय कार्यकारिणी स्तरावरुन नमो अॅप समर्पण अभियान सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच भाजपा हितचिंतक यांनी पार्टी फंड म्हणून ५ रु.ते १००० रु.मायक्रो डोनेशन रुपाने ‘नमो अॅप‘च्या माध्यमातून कशाप्रकारे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये कीमान २५ कार्यकर्त्यांनी…

Read More

विविध स्पर्धेत अणसूर-पालच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान आयोजित अणसूर-पाल हायस्कूलच्या बाळकृष्ण राऊळ, शिवराम गावडे व प्राप्ती गावडे यांनी मॅरेथॉन स्पर्धेत लहान गटात प्रथम व द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत दिक्षा पालकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

Read More

निबंध स्पर्धेत यशश्री केरकरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये अणसूर-पाल हायस्कूलची विद्यार्थीनी कु. यशश्री चंद्रकांत केरकर (इ.दहावी) हिने निबंध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

वेत्ये ग्राम पंचायतीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.२३-:* हिंदूहृदसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात 96 व्या जयंतीनिमित्त वेत्ये ग्रामपंचायत येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, जितु गावकर आदी उपस्थित होते.

Read More

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जलसंवाद कार्यक्रम

*⚡कणकवली ता.२३-: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गडकिल्ल्यांवर कायम पाणी उपलब्ध करण्यासाठी योजना आखली, तसे प्रयत्न जलसंवर्धनासाठी करावे लागतील, असे प्रतिपादन लेखक-अभिनेता प्रमोद कोयंडे यांनी केले. नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत जल संवाद कार्यक्रम पार पडला. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. आजही महाराष्ट्रातील…

Read More

पुन्हा अवकाळी पाऊस

शेतकरी-बागायतदारांची चिंता वाढली सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडीत आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण दिसून येत होते. तर आता तुरळक पावसाने देखील सुरुवात केली असून, शेतकरी आणि बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू पिकांवर होण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read More
You cannot copy content of this page