समर्पण नमो ऍप बाबत भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

ऍपच्या माध्यमातून जमा होणार पार्टी फंड

वेंगुर्ला प्रतिनिधी – राष्ट्रीय कार्यकारिणी स्तरावरुन नमो अॅप समर्पण अभियान सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच भाजपा हितचिंतक यांनी पार्टी फंड म्हणून ५ रु.ते १००० रु.मायक्रो डोनेशन रुपाने ‘नमो अॅप‘च्या माध्यमातून कशाप्रकारे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये कीमान २५ कार्यकर्त्यांनी समर्पण अभियानात सहभागी करून घेण्यासाठीचे नियोजन शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आले.

वेंगुर्ला तालुका भाजपाच्या शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी प्रसन्ना देसाई, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे, रविंद्र शिरसाठ, ज्ञानेश्वर केळजी यांच्यासह जगन्नाथ राणे, विद्याधर धानजी, महादेव नाईक, विजय बागकर, गणेश गावडे, निलेश मांजरेकर, विजय बोवलेकर, सुधीर गावडे, रुपेश राणे, नाथा मडवळ, आनंद गावडे व शशी करंगुटकर आदी शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

३० जानेवारी रोजी होणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात‘ कार्यक्रम प्रत्येक बुथ वर किमान एक ठिकाणी दाखविण्यात यावेत आणि त्यात बुथ सदस्यांबरोबर नागरिकांनाही सामावून घेण्यात यावेत असे ठरविण्यात आले. फोटोओळी – शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत बाळू देसाई यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page