पाळणेकोड धरण परिसरात बाळासाहेबांचे वृक्षरुपी स्मारक साकारले

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा पुढाकार : जयंतीनिमित्त स्मारकाला दिल्या मानवंदना

*⚡सावंतवाडी ता.२३-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी हिंदुहृदसम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाळणेकोडं धरण येथे वृक्षारोपण करून वृक्षरुपी स्मारक साकारले होते. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त त्याच क्लपवृक्ष स्मारकाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, पंकज मडये, तसेच जावेद शेख, लक्ष्मण कुडतरकर, भाई देऊलकर, सुधीर पराडकर, बावतीस फर्नांडिस, गणपत बांदेकर, रवी जाधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page