अंध अपंग, मूकबधिर इत्यादी आजाराने ग्रस्त रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात होणार तपासणी…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.२४-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात अंध-अपंग, मूकबधिर कर्णबधिर अस्थिव्यंग यांच्यासाठी डॉक्टर येऊन तपासणी करून दाखल देणार आहेत ही तपासणी 25 जानेवारी रोजी होणार आहे अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.

हा उपक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. या दाखल्याचा फायदा वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमासाठी होणार असून प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अशा दाखल्याचा फायदा होणार असून मासिक मानधन एक हजार रुपये मिळणार आहे. यासाठी तालुक्याच्या तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन सेतू मार्फत 50 हजारच्या आत उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. हा दाखला संजय गांधी योजनेअंतर्गत कार्यरत कक्षामध्ये जाऊन अर्ज भरून घ्यावा अर्जासोबत रेशनिंग कार्ड व आधार कार्ड तसेच पासपोर्ट साईज फोटो, बँकेचे पासबुक सदरील दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या विशेष कार्यक्रमात संजय गांधी योजनेअंतर्गत हजार रुपये मानधन मिळणार असून याचा फायदा सर्व गोरगरीब जनता यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे या दाखल्यामुळे शासकीय रुग्णालयात मोफत लाभ मिळणार असून एसटी प्रवास खर्च सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहे. समाजातील जाणकारांनी त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी लाभ देण्याचे कार्य करावे तसेच समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी जनतेला लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page