Headlines

सावरवाड येथील मैत्री ग्रुपची कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

ग्रुपतर्फे आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड येथील मैत्री ग्रुपच्यावतीने कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देत ग्रुपतर्फे या आश्रमाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत देणगी स्वरूपात करण्यात आली. यावेळी मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रुपतर्फेसुरेश बिर्जे यांचा सत्कारही करण्यात आला.

Read More

सावंतवाडी पंचायत समिती क्रीडा महोत्सव

माजी सभापती रवींद्र मंडगांवकर यांनी केले उदघाटन;सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आयोजन सावंतवाडी ता.०४-:* पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर आदी उपस्थित…

Read More

शिक्षक समितीचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी हिताचे : मिलिंद मेस्त्री

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचा शैक्षणिक उपक्रम कणकवली ता.०४-:* इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी ३ मार्च २२ रोजी राबवण्यात आला. कणकवली तालुक्यातील सर्व २२ केंद्रात शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांची परीक्षा घेण्यात आली. तालुकास्तरीय उदघाटन सोहळा कणकवली…

Read More

शिक्षक समितीचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम कौतुकास्पद

सभापती अक्षता डाफळे वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समितीचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाची ठरत आहे.असे प्रतिपादन वैभववाडी सभापती सौ.अक्षता डाफळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यात तीन परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी घेण्यात आली.या सराव परीक्षेचे उद्दघाटन अ.रा.विदयालय वैभववाडी येथे…

Read More

धक्काबुक्कीत एकजण जखमी

गाडी पार्किंगबाबत विचारणा केल्याने घडला प्रकार सावंतवाडी ता.०३-:* गाडी पार्किगबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या धक्काबुक्कीत एक जण जखमी झाला आहे ही घटना आज दु दीड वा सुमारास येथील शिरोडा नाका परिसरात घडली दोन्ही गटाने येथील पोलिस ठाण्यात धाव घेत परस्परविरोधी तक्रार दिली आहे

Read More

भंडारी हायस्कुलच्या अंगणवाडी भिंती मुलांच्या प्रगल्भता वाढविणाऱ्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे गौरवोद्गार मालवण दि प्रतिनिधी भंडारी प्राथमिक शाळेचा बालवाडी वर्ग शैक्षणिक दृष्ट्या अतिशय कल्पकतेने व नाविन्यपूर्ण पद्धतीने साकारला गेला आहे. वर्गाच्या भिंतीवर अभ्यासाच्या दृष्टीने रेखाटलेली चित्रे आकर्षक असून यामुळे लहान मुलांची वैचारिकता आणि प्रगल्भता वाढण्यास मदत होणारा असल्याने हा शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत आणि दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

Read More

घाडीगांवकर मराठा समाजाचा १३ मार्चला वधु-वर मेळावा

नोंदणी करण्याचे समाज बांधवांना आवाहन देवगड-: घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान, कल्याण या संस्थेच्यावतीने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घाडीगावकर समाजातील बांधवांना कळविण्यात येते की, उपरोक्त संस्थेने कल्याण मध्ये रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता “भव्य वधू-वर परिचय मेळावा” आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्यांसाठी नाव नोंदणी सुरु झालेली…

Read More

मानसी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांची उपस्थिती ओरोस-: मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने ओरोस येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपण समाजाचे घटक असतो, त्यामुळे या समाजाप्रती सामाजिक कार्य केले पाहिजे ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहीजे. मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य सर्वत्र घडो, व या प्रतिष्ठानचा वटवृक्ष होवो…

Read More

कुणकेश्वर यात्रौत्सव मधून देवगड आगाराला १लाख ४० हजार उत्पन्न

देवगड ता.०३-:* तालुक्यातील श्री कुणकेश्वर व श्री क्षेत्र रामेश्वर यात्रेमधून रापम देवगड आगाराला रु १लाख ४० हजार ०९५ /-रु एवढे उत्त्पन्न १४५ फेऱ्यांद्वारे प्राप्त झाले आहे. देवगड कुणकेश्वर, तळेबाजार,विजयदुर्ग,रामेश्वर या मार्गावर देवगड आगाराने एकूण १३ प्रवासी गाड्याची व्यवस्था करण्यात आली होती. या गाड्यांद्वारे ३४५५ की.मी.मधून ६२३५ प्रवासी वाहतूक करण्यात आली.एकूण १३ चालक ,१२ वाहक कार्यरत…

Read More

सिंधुदूर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची ६ मार्च ओरोसला सभा

सावंतवाडी ता.०३-:* ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग ची सभा रविवारी ६ मार्च २०२२ ला ओरोस रवळनाथ मंदीर ता.कुङाळ येथे सकाळी १०:३० आयोजित केली आहे. या सभेस ग्रा.पं.कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हास्तरावर आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सभेचे आयोजन केले असून जिल्हयातील सर्व ग्रा.प.कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हनुमान केदार व सचिव वैशाली नाईक यांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page