सावंतवाडी पंचायत समिती क्रीडा महोत्सव

माजी सभापती रवींद्र मंडगांवकर यांनी केले उदघाटन;सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आयोजन

सावंतवाडी ता.०४-:* पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्या ५ मार्च रोजी पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून, यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

You cannot copy content of this page