उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांची उपस्थिती
ओरोस-: मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने ओरोस येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपण समाजाचे घटक असतो, त्यामुळे या समाजाप्रती सामाजिक कार्य केले पाहिजे ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहीजे. मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य सर्वत्र घडो, व या प्रतिष्ठानचा वटवृक्ष होवो असे प्रतिपादन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा संजना परांजपे यांनी या शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी केले. मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने ओरोस येथे गुरूवारी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजना परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव, डाॅ. विजय गावकर, प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड. प्रसाद करंदीकर, सचिव महेश परूळेकर, खजिनदार जगन्नाथ जुवेकर, सदस्य शैलेंद्र पेडणेकर, अजित कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पराडकर, सचिन सावंत, रौनक पटेल, विजय कुडव, स्वप्निल गावडे, शामसुंदर सावंत, अशोक बिरमोळे, विजय साळसकर, चंद्रकांत म्हापणकर, सतीश केसरकर, सिमा लंगोटे, मिताली केळुसकर, ज्योती जाधव, गिताली आडकर, प्रशांत हरेर, संजय नाईक तसेच जिल्हा रूग्णालय रक्तपेढी विभागाचे डाॅ सौरश लिहीतकर, सुनील बागवे, अधिपरिचारीका प्रांजली परब, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते किशोर नांदगावकर, नितीन गावकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष अनिल जाधव यांनी सांगितले की, ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी सामाजिक कामे केली, आज मानसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सामाजिक उपक्रम आम्ही राबवित आहोत याचा खुप आनंद आहे. या ही पुढे शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले जाणार असे सांगितले.
यावेळी अॅड प्रसाद करंदीकर यांनी सांगितले की, आपण समाजाचे देण लागतो या भावनेतून या मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व अनिल जाधव यांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या या उपक्रमांना व संकल्पाला सर्वांनी सहकार्य करूया असे आवाहन केले. तर डाॅ. विजय गावकर यांनी सांगितले की, सध्या रक्तदानाची गरज आहे व या संस्थेच्या माध्यमातून जे रक्तदान शिबिराचे आयोजन केले हे खुप चांगले आहे. भविष्यात या संस्थेचे वटवृक्ष होईल. व शैलेंद्र पेडणेकर यांनी सांगितले की, समाजाचे देण लागतो या भावनेतून मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महेश परूळेकर यांनी सांगितले की, प्रतिष्ठानचा वतीने यापुर्वी मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप, नेत्र तपासणी, मोती बिंदु शस्त्रक्रिया असे सामाजिक उपक्रम राबविले असुन आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आभार प्रदर्शन जगन्नाथ जुवेकर यांनी मानले.
