घाडीगांवकर मराठा समाजाचा १३ मार्चला वधु-वर मेळावा

नोंदणी करण्याचे समाज बांधवांना आवाहन

देवगड-: घाडीगांवकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान, कल्याण या संस्थेच्यावतीने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घाडीगावकर समाजातील बांधवांना कळविण्यात येते की, उपरोक्त संस्थेने कल्याण मध्ये रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता “भव्य वधू-वर परिचय मेळावा” आयोजित केलेला आहे.

सदर मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्यांसाठी नाव नोंदणी सुरु झालेली असून, ज्या समाज बांधवांना नाव नोंदवायचे असेल, त्यांनी सोमा घाडीगावकर ९८१९ ३७१८४४ व रुपेश घाडी ८०९७ १९२ ७८४ यांना या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सदर मेळावा covid-19 बाबतचे नियम पाळून होईल याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे. असे प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह सोमा भानू घाडीगावकर यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page