देवगड ता.०३-:* तालुक्यातील श्री कुणकेश्वर व श्री क्षेत्र रामेश्वर यात्रेमधून रापम देवगड आगाराला रु १लाख ४० हजार ०९५ /-रु एवढे उत्त्पन्न १४५ फेऱ्यांद्वारे प्राप्त झाले आहे. देवगड कुणकेश्वर, तळेबाजार,विजयदुर्ग,रामेश्वर या मार्गावर देवगड आगाराने एकूण १३ प्रवासी गाड्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या गाड्यांद्वारे ३४५५ की.मी.मधून ६२३५ प्रवासी वाहतूक करण्यात आली.एकूण १३ चालक ,१२ वाहक कार्यरत ठेवण्यात आले .होते.या यात्रा उत्सवात पहिली फेरीचा मान चालक नामदेव कांबळे आणि वाहक किरण खाडये यांनी मिळविला.विभागीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक निलेश लाड, वैभव पडोळे,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,सहा.वाहतूक निरीक्षक लवू सरवदे, वाहतूक नियंत्रक उमाकांत सोमण ए.डी आरोलकर,एल.डी पवार ,कार्यशाळा कर्मचारी ब्रम्हदेव चव्हाण,हेड मॅकेनिक श्री राणे,जामसंडेकर,रोखपाल प्रवीण तिरलोटकर किशोर घाडी,लिपिक चैत्राली मांजरे,तसेच रत्नागिरी विभागाचे चालक वाहक यांनी यात्रा सेवा यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली.
