सभापती अक्षता डाफळे
वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समितीचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाची ठरत आहे.असे प्रतिपादन वैभववाडी सभापती सौ.अक्षता डाफळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यात तीन परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी घेण्यात आली.या सराव परीक्षेचे उद्दघाटन अ.रा.विदयालय वैभववाडी येथे करण्यात आले.यावेळी सभापती डाफळे बोलत होत्या.
यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, जि.प.सदस्य सुधीर नकाशे, अ.रा.विदयालयाचे अधिक्षक जयेंद्र रावराणे , गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिरी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष शरद नारकर, शिक्षक नेते सुनिल चव्हाण, वैभववाडी अध्यक्ष रफीक बोबडे, महादेव शेटये, संजय पडते, सुधीर गोसावी, पंढरीनाथ सावंत, गजानन टक्के , नवनाथ सगरे, अनंत चव्हाण, शिवराज कर्ले, सोनाली केरकर, विलास पाष्टे आदी उपस्थिती होते.
आदर्श विदयामंदिर भुईबावडा ३७, अ.रा.विदयालय वैभववाडी ३३, खांबाळे केंद्र शाळा ४४ या तीन केंद्रावर ११४ विदयार्थ्यांनी ही सराव परीक्षा दिली आहे.या परीक्षेबाबत विदयार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. फोटो- शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे अ.रा.विदयालय वैभववाडी येथे उद्दघाटन प्रसंगी सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे व इतर छाया संजय शेळके वैभववाडी
