Headlines

महसूल कामर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या सिंधुदुर्गनगरी ता ०४ महाराष्‍ट्र राज्‍य महसुल कर्मचारी संघटना जिल्‍हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन करत निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी ४ एप्रिल पासून संप पुकारला आहे.या संपास सुरुवात झाली असून १०० टक्के कर्मचारी या संपात बेमुदत…

Read More

मधुरा मेस्त्री यांना विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार

माध्यमिक-उच्च माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव सिंधुदुर्गनगरी ता ०४ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर गावराई- सुकळवाड च्या शिक्षिका श्रीमती मधुरा गोपाळ मेस्त्री यांना “विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथे…

Read More

हेमा नाईक यांना ‘इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ प्रदान..

सावंतवाडी ता.०४-:* मोरगाव येथील अंगणवाडी क्रमांक-७ च्या उपक्रमशील सेविका हेमा हरिश्‍चंद्र नाईक यांना त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ‘इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ देऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पणजी येथे संपन्न झालेल्या ग्लोबल टुरिझम समिट अँड अवॉर्ड कार्यक्रमात त्यांना ‘ इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ या मानाच्या पुरस्काराने…

Read More

नेमळे स्वयं लिंग स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

सावंतवाडी ता.०४-:* नेमळे येथील स्वयं लिंग स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प.पू महेश राऊळ महाराज यांनी उपस्थितांना संदेश दिला. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच पूजा,आरती, महाप्रसाद आणि भजन देखील करण्यात आले. यावेळी रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळाही संपन्न झाला

Read More

८ एप्रिलपासून श्री रामनवमी महोत्सव २०२२

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे आयोजन;इस्कॉन भटवाडी येथील हरे कृष्ण संस्कार केंद्रात होणार कार्यक्रम सावंतवाडी ता.०४-:* आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्यावतीने 8 ते 10 एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव हरे कृष्ण संस्कार केंद्र इस्कॉन भटवाडी येथे होणार आहे यावेळी श्रीमान औदार्यगौर दास हे प्रवचन करणार आहेत. या श्री रामनवमी महोत्सवात…

Read More

पंचायत महिला फेडरेशन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आफ्रोजा नावळेकर

तर उपाध्यक्षपदी प्रणया टेमकर कणकवली ता.०४-:* महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने बांधणी करण्यात आलेल्या पंचायत महिला फेडरेशन ची बैठक पंचायत समिती कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंचायत महिला फेडरेशनच्या राज्य निमंत्रक तथा महिला राजसत्ता आंदोलनाच्या नागपूर विभाग समन्वयक रत्नमाला ताई वैद्य व महिला राजसत्ता आंदोलनाच्या कोकण विभाग समन्वयक हर्षदा वाळके उपस्थित होत्या. पंचायत महिला…

Read More

मोहनराव सावंत यांचे सामाजिक कार्य आदर्शवत

नाम.उदय सामंत;मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण सोहळा कणकवली ता.०४-:* मोहनराव सावंत यांचे सामाजिक कार्य जिल्ह्यातील राजकारणातील नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे . त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा सर्वांनी पुढे नेला पाहिजे , असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कै.मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण…

Read More

रेडी येथे ७ पासून दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला ता.०४-:* केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप, रेडी यांच्या तर्फे रेडी येथे सहा दिवसीय भव्य दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन ७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. रेडी ग्रामपंचायत पटांगण येथे ७ ते १२…

Read More

टीचर टॉक फोरमची वेंगुर्ला कार्यकारिणी जाहिर

वेंगुर्ला ता.०४-:* एस.आर.दळवी फाऊंडेशन ‘टीचर टॉक फोरम‘ची वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात किशोर सोन्सुरकर (अध्यक्ष), प्रसाद गावडे (उपाध्यक्ष-कार्यक्रम), प्रसाद जाधव (उपाध्यक्ष-विकास), सरोज जानकर (सचिव), गौरव नाईक (सहसचिव) आदींचा समावेश आहे. ही निवड एस.आर.दळवी फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी जाहीर केली आहे. शिक्षक सक्षमीकरणासाठी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी…

Read More

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून प्रा.खानोलकर यांच्या सूत्रसंचालनाचे कौतुक

वेंगुर्ला ता.०४-:* आपल्या अभ्यासपूर्ण सुत्रसंचालनासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांच्या सुत्रसंचालनाने गोवावासीयांनाही भुरळ पाडली आणि खुद्द गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रा.खानोलकर यांचे कौतुक करत शाल व सन्मानचिन्ह प्रदान करीत त्यांचा गौरव केला. कोरोना काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटवल्यानंतर गोवा राज्यात पर्यटन महोत्सव कार्याक्रमाचा दिमाखदार सोहळा गोव्याची राजधानी पणजी येथे…

Read More
You cannot copy content of this page