सावंतवाडी ता.०४-:* नेमळे येथील स्वयं लिंग स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प.पू महेश राऊळ महाराज यांनी उपस्थितांना संदेश दिला.
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच पूजा,आरती, महाप्रसाद आणि भजन देखील करण्यात आले. यावेळी रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळाही संपन्न झाला
