हेमा नाईक यांना ‘इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ प्रदान..

सावंतवाडी ता.०४-:* मोरगाव येथील अंगणवाडी क्रमांक-७ च्या उपक्रमशील सेविका हेमा हरिश्‍चंद्र नाईक यांना त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ‘इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ देऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पणजी येथे संपन्न झालेल्या ग्लोबल टुरिझम समिट अँड अवॉर्ड कार्यक्रमात त्यांना ‘ इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड’ या मानाच्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हेमा नाईक या अत्यंत उपक्रमशील अंगणवाडी सेविका असून त्यांनी लोकसहभागातून शैक्षणिक उठाव, अंगणवाडी रंगविणे उपक्रम, सावित्रीबाई फुले जयंती- बालिका दिन, तसेच आझादी का अमृत महोत्सवचे औचित्य साधून विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

तसेच गरोदर स्तनदा मातांना आहार व आरोग्याचे शिक्षण घेऊन पोस्टर प्रदर्शन उपक्रम राबविले, 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना ऐतिहासिक गड किल्ले बनविणे, तसेच अंगणवाडी परसबाग निर्मिती उपक्रम अशा विविध उपक्रमांची त्यांनी अंमलबजावणी केली आहे. 2017 साली त्यांच्या अंगणवाडीला आयएसओ नामांकन त्यांनी प्राप्त केले आहे. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत त्यांना ग्लोबल टुरिझम समिट अँड अवॉर्ड कार्यक्रमात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत पडते यांच्या शुभहस्ते ‘ इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले. हेमा नाईक यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून विशेष अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page