मधुरा मेस्त्री यांना विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार

माध्यमिक-उच्च माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव

सिंधुदुर्गनगरी ता ०४ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर गावराई- सुकळवाड च्या शिक्षिका श्रीमती मधुरा गोपाळ मेस्त्री यांना “विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथे ३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार रमेश दादा पाटील ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते चेतन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अर्चनाताई घारे (परब), सिनेअभिनेता दत्ताराम टोपले ,सामाजिक कार्यकर्ती गायत्री सातोस्कर ,सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे , कार्याध्यक्ष बी बी चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या जिल्हस्तरीय मेळाव्यात सरस्वती विद्यामंदिर गावराई -सुकळवाडच्या शिक्षिका श्रीमती मधुरा गोपाळ मेस्त्री यांनी त्यांच्या शिक्षण प्रक्रियेतील विकासात्मक कार्याबद्दल विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी वर्गात कौतुक होत आहे

You cannot copy content of this page