आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे आयोजन;इस्कॉन भटवाडी येथील हरे कृष्ण संस्कार केंद्रात होणार कार्यक्रम
सावंतवाडी ता.०४-:* आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्यावतीने 8 ते 10 एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव हरे कृष्ण संस्कार केंद्र इस्कॉन भटवाडी येथे होणार आहे यावेळी श्रीमान औदार्यगौर दास हे प्रवचन करणार आहेत.
या श्री रामनवमी महोत्सवात 8 व 9 रोजी सायंकाळी 6 ते 8 रामकथा, 10 रोजी सकाळी 6 वा मंगलआरती, 6 30 ते 8 30 जप , 10 ते 11 महाभिषेक, पुष्पाभिषेक, 11 ते 1 रामकथा नंतर आरती कीर्तन व महाप्रसाद होणार आहे भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या वतीने करण्यात आले आहे
