पंचायत महिला फेडरेशन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आफ्रोजा नावळेकर

तर उपाध्यक्षपदी प्रणया टेमकर

कणकवली ता.०४-:* महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने बांधणी करण्यात आलेल्या पंचायत महिला फेडरेशन ची बैठक पंचायत समिती कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंचायत महिला फेडरेशनच्या राज्य निमंत्रक तथा महिला राजसत्ता आंदोलनाच्या नागपूर विभाग समन्वयक रत्नमाला ताई वैद्य व महिला राजसत्ता आंदोलनाच्या कोकण विभाग समन्वयक हर्षदा वाळके उपस्थित होत्या. पंचायत महिला फेडरेशन ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली.

अध्यक्ष आफ्रोजा नावळेकर कणकवली, उपाध्यक्ष प्रणया टेमकर मालवण, सचिव निलिमा मसूर कर देवगड, कार्याध्यक्ष आरती पाटील कुडाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पंचायत मध्ये काम करणाऱ्या महिला पंच सरपंच यांना आपल्या समस्या प्रश्न मांडण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत महिला फेडरेशन ची बांधणी करण्यात आली. रत्नमाला ताई वैद्य यांनी संघटने विषयी तसेच फेडरेशन विषयी माहिती सांगितली. पंच सरपंच यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात तालुका कार्यकारिणी तयार करण्या संदर्भात चर्चा झाली.

You cannot copy content of this page