मोहनराव सावंत यांचे सामाजिक कार्य आदर्शवत

नाम.उदय सामंत;मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण सोहळा

कणकवली ता.०४-:* मोहनराव सावंत यांचे सामाजिक कार्य जिल्ह्यातील राजकारणातील नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे . त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा सर्वांनी पुढे नेला पाहिजे , असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कै.मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.याचे उदघाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

मुंबईमध्ये राजकीय कारकीर्द घडवत असताना आपल्या गाव काही देणे लागतो या भावनेतून कै.मोहनराव मुरारी सावंत यांनी १९७४ मध्ये जागा खरेदी करून त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून ते शासनाच्या स्वाधीन केले.हे त्यांचे सामाजिक कार्य जिल्ह्यातील नव्या पिढीतील राजकारणाला आदर्शवत आहे,असे श्री सामंत यांनी सांगितले.आरोग्य विभागाच्यावतीने एक कोटी रुपये खर्चाचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली होती या इमारतीला पूर्वीप्रमाणेच मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र असे नामकरण करण्यात आले तसेच या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,तालुका प्रमुख प्रथमेश सावंत,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे, तहसीलदार रमेश पवार,जिल्हाप्रमुख संजय पडते,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुका प्रमुख शैलेश भोगले,बाळा भिसे,अँड हर्षद गावडे,महेंद्र सावंत, सरपंच,सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

ना.उदय सामंत पुढे म्हणाले, कनेडी दशकोशीतील २० गावांच्या सेवेसाठी १९७४ मध्ये मोहनराव मुरारी सावंत यांनी त्यावेळी माजी विद्यार्थी संघ आणि कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली होती.त्यामुळे शेकडो लोकांचे जीव आजवर वाचले आहे.मुंबईत राजकारण करत असताना गावाकडील अनेक विकासकामे मोहनरावांनी केली. शैक्षणिक सुविधा असो, आरोग्याच्या सुविधा असो किंवा सामाजिक पातळीवरच्या सुविधा त्यांनी या दशकोशीमध्ये निर्माण केल्या.या इमारतीच्या पुढील बांधकामासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे.

मोहनराव यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचा योग मला आला. हा अविस्मरणीय आहे.असेही श्री.सामंत यांनी यावेळी आवर्जून सांगितले. सतीश सावंत म्हणाले,माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून रुग्णालय बांधत असताना मुद्दाम उदाहरणे द्यावी गावागावात जाऊन आरोग्याची सुविधा निर्माण करण्यासाठी निधी गोळा केला भव्य अशी जागा खरेदी करून येथे आरोग्य केंद्र उभे केले अलीकडच्या करूणा कालावधीत इथल्या आरोग्य कर्मचा – यांनी चांगली सेवा दिली .

या इमारतीचे निकृष्ट बांधकाम सुरू होती त्याला स्थानिकांनी विरोध केला . त्यानंतर ही इमारत भव्य दिव्य अशी उभी राहिली या इमारतीला अजूनही सुसज्जता यावी म्हणून सुशोभिकरण व्हावे , अशी मागणी सावंत यांनी पालकमंत्र्यांकडे केली . डॉ.प्रथमेश सावंत यांनीही मनोगतामध्ये आपल्या वडिलांचा आदर्श समाजापुढे ठेवून मी ही यापुढे कार्यरत राहील माझ्या वडिलांनी केलेल्या कार्याचा जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन त्यांचे नाव कायम ठेवले हा विश्वास माझ्यासाठी बळ देणारा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी केले .

You cannot copy content of this page