रेडी येथे ७ पासून दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला ता.०४-:* केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप, रेडी यांच्या तर्फे रेडी येथे सहा दिवसीय भव्य दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन ७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

रेडी ग्रामपंचायत पटांगण येथे ७ ते १२ एप्रिल या कालावधीत रोज सायंकाळी ७ वाजता सुरु होणा-या या महोत्सवात दि.७ रोजी जय हनुमान दशावतार मंडळ आरोस यांचा ‘विघ्न निवारी गजमुख तारी‘, दि. ८ रोजी देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार मंडळ चेंदवण यांचा ‘वज्रशल्क‘, दि. ९ रोजी नाईक दशावतार मंडळ झरेबांबर यांचा ‘सत्वपरिक्षा‘, दि.१० रोजी मामा मोचेमाडकर दशावतार मंडळ मोचेमाड यांचा ‘मायावी मधुवंती‘, दि. ११ रोजी मयुर गवळी संचलित हेळेकर दशावतार मंडळ कारीवडे यांचा ‘महिमा संकष्टी व्रताचा‘, दि. १२ रोजी खानोलकर दशावतार मंडळ खानोली यांचा ‘विक्रमासूर लावण्यवती‘ आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी या नाट्य महोत्सवामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page