टीचर टॉक फोरमची वेंगुर्ला कार्यकारिणी जाहिर

वेंगुर्ला ता.०४-:* एस.आर.दळवी फाऊंडेशन ‘टीचर टॉक फोरम‘ची वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात किशोर सोन्सुरकर (अध्यक्ष), प्रसाद गावडे (उपाध्यक्ष-कार्यक्रम), प्रसाद जाधव (उपाध्यक्ष-विकास), सरोज जानकर (सचिव), गौरव नाईक (सहसचिव) आदींचा समावेश आहे. ही निवड एस.आर.दळवी फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी जाहीर केली आहे.

शिक्षक सक्षमीकरणासाठी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी सीता दळवी यांनी मुंबईत या राज्यस्तरीय फाऊंडेशनची स्थापना केली आहे. विविध वेबिनारच्या माध्यमातून शिक्षकांना समृद्ध केले जाणार आहे. तसेच शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन होणार आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सर्वस्तरातील शिक्षक फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. फाऊंडेशनने ‘टीचर टॉक‘ नावाचे अॅप निर्माण केले असून याच व्यासपिठाच्या माध्यमातून शिक्षकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याद्वारे विचारांची देवाणघेवाण होणार आहे. याच अॅपच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि इतर सर्वच प्रकारच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तिनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page