Headlines

डॉ.आंबेडकर भारतीयांसाठी प्रेरणास्थान – प्रा. नागेश कदम

मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन सुनितादेवी अध्यापक महाविद्यायलाचे प्रा. नागेश कदम यांनी मालवण येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक…

Read More

मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील ८४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

मालवण ता.०८-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी,विद्युत अभियांत्रिकी व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये शिकणाऱ्या ८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो, फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी या विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. याव्यतिरिक्त एल.एन.टी. ,इन्फोसिस , जी.ई. ,टी.सी.ई. , टाटा मोटर्स आदी अनेक इंडस्ट्रीजमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू…

Read More

बॅ. नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा संपन्न

मालवण ता.०८-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण व सिंधुदुर्ग शिक्षक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे झाली. परीक्षेत हायस्कूलमधील २४५ विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धा परीक्षेचा उद्घाटन समारंभ शालेय समिती अध्यक्ष व पत्रकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्यांना नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त…

Read More

बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर प्रथम

मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कुडाळ येथील शितल किरण कदम यांनी द्वितीय तर मालवणच्या माधवी लिलाधर तिरोडकर यांनी तृतीय…

Read More

कुंभवडे ते तळकट रस्त्यासाठी राज्याच्या बजेटमधून निधी

आ दीपक केसरकर यांचा प्रयत्न;विजय गावडे, अभिजित मेस्त्री यांची माहिती सावंतवाडी ता.०८-:* आंबोली घाटाला एक उत्तम पर्याय असणाऱ्या आंबोली-चौकुळ-कुंभवडे-बांदा रस्त्यावरील कुंभवडे ते तळकट रस्त्याचा काही भाग अपूर्ण अवस्थेत होता. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करण्यासाठी नागरिकांना अवघड जात होते. या रस्त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्य शासनाच्या बजेट मधून मंजुरी मिळवली असून, या रस्त्यामुळे आता कुंभवडे…

Read More

अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी निवेदनाद्वारे…

Read More

सोमय्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाका

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सावंतवाडी शिवसेनेचे पोलिसांना निवेदन सावंतवाडी ता.०८-:* आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक…

Read More

धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

मालवण ता.०७-:* मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि.११ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. नारायण मंदिर देऊळवाडा, मालवण येथून मिरवणूक एसटी स्टॅन्ड भरड नाका बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार

आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास सिंधुदुर्गनगरी ता ०७-:* एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

Read More

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची बाजार भावाप्रमाणे नुकसानभरपाई द्या

संदेश पारकर यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ऐन हंगामी सिझनला अवकाळी वादळी पाऊस पडल्याने आंबा, काजु, कोकम, नारळ, केळी, पोफळी आणि अन्य फळ आणि पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात पडलेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते…

Read More
You cannot copy content of this page