बांदा-उभाबाजार हनुमान मंदिरात दोन दिवस हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
बांदा ता.१३-:* बांदा शहरातील उभाबाजार येथील प्रसिद्ध श्री दक्षिणाभीमुखी हनुमान मंदिरात शुक्रवार दिनांक १५ व शनिवार दिनांक १६ रोजी दोन दिवस श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ रोजी रात्री १० वाजता स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ डेगवे यांचा “श्रीकृष्ण हनुमान युद्ध” हा पौराणिक…
