डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपक्रम
*⚡कणकवली ता.१३-:* डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण आयोजित इयत्ता ५ वी विद्यार्थी तळेरे प्रभागस्तरीय भव्य मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा – २०२२ चा शुभारंभ जि प पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सौ गौरी शिंदे, पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संतोष पाटणकर,उपाध्यक्ष जितेंद्र कदम,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण अध्यक्षा सौ. आकांशा पाटणकर,सचिव – सौ आरोही राहुल पाटणकर,मंडळाचे कार्यकर्ते सागर पोमेडकर,प्रथमेश कदम, धीरज जुमलेकर,खारेपाटण व शेर्पे चे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल,कसार्डे केंद्रप्रमुख संजय पवार,साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष तथा जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.तर क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला आकांशा पाटणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
खारेपाटण – तळेरे प्रभागातील एकूण ५५ शालेय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभाग घेतला. बाबासाहेबांचे समतेचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत.हे एकमेव उद्दिष्ट डोळयांसमोर ठेऊन या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी शीष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले.
या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत गुणवंत विदयार्थ्यांना प्रमाणपत्,सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते आंबेडकर जयंती दिवशी खारेपाटण पंचशील नगर येथे सकाळी १०.०० वाजता गौरविण्यात येणार आहे. या सराव परिक्षेकरिता अमोल भंडारी ,राजू गर्जे, अनिल खोत,सत्यवान केसरकर,सुनील तांबे,श्रीम साधना लोकरे,एकनाथ सावळे,प्रवीण कासार,लक्ष्मण राणे,श्रीम सोनाली कुर्ले, स्वाती झिर्ले, श्री मुंढे सर,काशिनाथ कळसुलकर सर आदी खारेपाटण – तळेरे प्रभागातील शिक्षकांनी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.
