कणकवली येथे नृत्य शिबीराचे आयोजन

नृत्य दिग्दर्शक फुलवा सोबत शोच्या दिवशी नृत्य करण्याची संधी

कणकवली ता.१३-:* कणकवली एस. के.डान्स अकॅडमीच्यावतीने 17 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत कणकवली येथे नृत्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. डान्स स्टाईल, हिप – हॉप , कंटेम्पररी , बॉलिवूड. महिलांसाठी स्पेशल बॉलिवूड , लावणी व भव्य डान्स शो कणकवली येथे व्ही मॉल , झेंडा चौक जवळ , बाजारपेठ रोड कणकवली येथे होणार आहे .इच्छुक असलेल्या पालकांनी 8624830027 संपर्क साधावा. उन्हाळी सुटटी निमित्ताने कोकण मधील होतकरू मुला / मुलींना तसेच इच्छुक महिलांना मिळणार आहे.

मराठी चित्रपट नृत्य दिग्दर्शक फुलवा ताई सोबत शो च्या दिवशी नृत्य करण्याची संधी आणि झी मराठी वाहिनीवरील ” एका पेक्षा एक ” शो चा विजेता व प्रसिध्द मालिका ” चला हवा येऊ दया ” मधील नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डसोजा च्या मार्गदर्शनाखाली डान्स शिकण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे . कणकवली ,मालवण, कुडाळ सावंतवाडी येथे नृत्य शिबिर होणार असल्याची माहिती संतोष पुजारे यांनी दिली.

You cannot copy content of this page