उपाध्यक्षपदी सौ आरती कावळे व सौ कीर्ती शेट्ये यांची निवड
कणकवली 13 एप्रिल (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ. आरती शीतल कावळे तर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ.कीर्ती संकेत शेट्ये यांची नुकतीच पालक सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. खारेपाटण जि प केंद्र शाळा नं.१ ची पालक सभा नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या सभागृहात झाली.
यावेळी सन – २०२२ – २३ ते सन २३ -२४ या पुढील दोन वर्षासाठी शाळेच्या माता पालक संघ व पालक शिक्षक संघ या दोन समित्यांची शालेय पालकामधून निवड करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अण्णा तेली, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. समीक्षा शेट्ये,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव व केंद्रशाळेचे उच्चश्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.सदर सभेत पुढील प्रमाणे सदस्यांची निवड करण्यात आली. माता पालक संघ – उपाध्यक्ष – सौ आरती शीतल कावळे,समिती सदस्य – सौ श्रद्धा निलेश जाधव,प्रियांका स्वप्नील गुरव,अनिता अजित उपाध्ये,अंजली विजय गोसावी,ममता चमणाराम मेवाड,दीपाली दिलीप पाटणकर, अमिषा अजित गुरव,संचिता सचिन निग्रे,प्रांजली प्रसन्नकुमार बाबरदेसाई, संध्या हर्षल पोरे,प्रिया प्रकाश निग्रे यांची निवड करण्यात आली तर या माता पालक संघाच्या सचिवपदी शाळेच्या शिक्षिका श्रीम समिधा सचिन शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे.
तर … पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष – सौ.कीर्ती संकेत शेट्ये,समिती सदस्य – श्रीम.आफ्रिन झुल्पिकार शेमने,श्री संदीप मधुकर पाटणकर,सौ पूर्वा प्रकाश गाठे,श्री निलेश प्रभाकर कावळे,सौ प्राची प्रकाश नानिवडेकर,मनोज धोंडीराम साटविलकर,प्रज्ञा प्रवीण घाडी, सौ.आरती अजय जेधे,सौ.श्रद्धा संदीप गुरव यांची सर्वानुंमते निवड करण्यात आली तर या पालक शिक्षक संघाच्या सचिव पदी शाळेच्या शिक्षिका श्रीम रेखा प्रदीप लांगी यांची निवड करण्यात आली.
खारेपाटण केंद्र शाळा नं १ च्या पालक सभेला मोठया संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी सभेचे प्रस्ताविक करून सभेला मार्गदर्शन केले.
